Tuesday, March 31, 2015

BOLLYWOOD>> ‘पप्पू की पगडंडी’ टोराण्टो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात

प्रतिनिधी, मुंबई

‘चिल्ड्रेन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया’ (सीएफ एसआय)ची निर्मिती असलेल्या ‘पप्पू की पगडंडी’ या चित्रपटाची निवड ‘टोराण्टो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी करण्यात आली आहे. कॅनडामध्ये ७ ते १९ एप्रिलदरम्यान होणाऱ्या टोराण्टो आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवात सीमा देसाई दिग्दर्शित ‘पप्पू की पंगडडी’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.

जगभरात लहान मुलांसाठी आयोजित के ल्या जाणाऱ्या चित्रपट महोत्सवांमध्ये टोरांटोचा बालचित्रपट महोत्सव सर्वात मोठा आहे. या महोत्सवासाठी ‘पप्पू की पगडंडी’ चित्रपटाची निवड झाल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो, असे सीएफएसआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रावण कुमार यांनी सांगितले. २०१३ मध्ये चिल्ड्रेन फिल्म सोसायटीच्या ‘गोपी गवैया बाघा बजैया’ या अॅनिमेशनपटाचा टोराण्टो महोत्सवातच भव्य प्रीमिअर करण्यात आला होता. आता याच महोत्सवात ‘पप्पू की पगडंडी’ची निवड झाली असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

सीमा देसाई यांनी दिग्दर्शित केलेल्या या ९० मिनिटे लांबीच्या चित्रपटात पप्पू नावाच्या लहान मुलाची गोष्ट सांगण्यात आली आहे. कनिष्ठ मध्यमवर्गातील कु टुंबातून आलेला पप्पू नव्या शाळेमध्ये स्वत:ला जुळवून घेतो आहे. त्याच वेळी त्याचे एका जिनीसोबत सुरू असलेला संवाद हा चित्रपटाचा मुख्य गाभा आहे. आनंदाला शॉर्टकट्स नसतात. आपला आनंद आपल्यालाच शोधायचा असतो, असा सकारात्मक संदेश या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे कुमार यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत चिल्ड्रेन फिल्म सोसायटीचे चित्रपट व्यावसायिक रीत्या प्रदर्शित करण्यातही आपल्याला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले. २०१२ मध्ये सोसायटीने ‘गट्टू’ हा पहिला चित्रपट व्यावसायिकरीत्या प्रदर्शित केला. त्यानंतर ‘गोपी गवैया बाघा बजैया’ हा चित्रपट, ‘कफल’ या चित्रपटाला ‘बेस्ट चिल्ड्रेन फिल्म’चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, अशी माहिती डॉ. श्रावण कुमार यांनी दिली.


बेस्ट लागली डुगडुगायला!

BEST BUS 2

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले, बस कुठे आहे आणि ती थांब्यावर कधी येणार, याची माहिती प्रवाशांना मोबाइलवर मिळावी, याकरता माहिती-तंत्रज्ञानाचा आधार घेऊन योजनेची अंमलबजावणी करण्यात आली, तर प्रवास सुकर व्हावा म्हणून केवळ दिसायला चकाचक अशी नवी आसने बसमध्ये बसवण्यात आली; मात्र आजघडीला तब्बल ८० टक्के बसगाडय़ांतील कॅमेरे बंद पडले आहेत.


BEST BUS 2 मुंबई – प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले, बस कुठे आहे आणि ती थांब्यावर कधी येणार, याची माहिती प्रवाशांना मोबाइलवर मिळावी, याकरता माहिती-तंत्रज्ञानाचा आधार घेऊन योजनेची अंमलबजावणी करण्यात आली, तर प्रवास सुकर व्हावा म्हणून केवळ दिसायला चकाचक अशी नवी आसने बसमध्ये बसवण्यात आली; मात्र आजघडीला तब्बल ८० टक्के बसगाडय़ांतील कॅमेरे बंद पडले आहेत.


दोन हजार ९०० गाडय़ांतील आसने डुगडुगत आहेत, तर एकाही प्रवाशाला आजतागायत बस कुठे आहे आणि ती किती वेळात थांब्यावर पोहोचणार, हे समजलेले नाही. या अपयशी योजनांमुळे तोटयातील बेस्टचे पैसे वाया गेले आणि त्याचा थेट फटका मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. सत्ताधारी शिवसेनेनेच याविरोधात हत्यार उपसले असून अपयशाचे खापर बेस्ट प्रशासनावर फोडण्यास सुरुवात केली आहे.


प्रवाशांसाठी सुविधांचे कारण पुढे करत अट्टहासाने बेस्ट प्रशासनाने बसगाडय़ांतील आसने बदलली, परंतु या तकलादू आसनांमुळे प्रवाशांना त्यावर धड बसताही येत नाही. बेस्टच्या ताफ्यातील सुमारे चार हजार बसगाडय़ांतील बरीच आसने डुगडुगू लागली आहेत. परिणामी बेस्ट बसमध्ये बसण्यापेक्षा उभ्याने प्रवास केलेला बरा, अशी प्रवाशांची भावना आहे.


बेस्टने मोठा गाजावाजा करत बसगाडी कुठपर्यंत आली, याचा अंदाज मोबाइलवर घेता यावा, यासाठी आणखी एक योजना सुरू केली होती. प्रत्येक बस थांब्यावर नमूद केलेल्या क्रमांकाच्या आधारे बसगाडी कुठपर्यंत पोहोचली आहे, किती वेळात थांब्यावर पोहोचेल, याचा अंदाज प्रवाशांना याद्वारे घेता येणार होता. यासाठी बहुसंख्य बस थांब्यांवर क्रमांक नमूद करण्यात आले; परंतु बेस्टची बस कुठपर्यंत पोहोचली आणि थांब्यावर पोहोचण्यास तिला किती वेळ लागेल, हे एकाही प्रवाशाला आजतागायत समजू शकलेले नाही.


प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसगाडय़ांत कॅमेरेही बसवण्यात आले; परंतु खड्डेमय रस्ते आणि बसचालकांच्या भरधाव गाडी हाकण्यामुळे हादरे सहन न करू शकलेले कॅमेरे अल्पावधीतच नादुरुस्त बनले. या कॅमे-यांत चित्रित झालेली बसगाडय़ांतील दृश्ये किती काळ साठवून ठेवायची, हा प्रश्नही बेस्टला भेडसावू लागला. त्यामुळे एखाद्या महिलेवर अतिप्रसंग घडल्यानंतर अथवा अन्य काही दुर्घटना घडल्यास बसमधील कॅमे-यातील चित्रीकरण मिळेलच याची शाश्वती नाही. आता तर बहुतांश गाडय़ांतील कॅमेरे बंदच पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा वा-यावर आहे.


दरम्यान, सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक सुहास सामंत यांनी, या योजनांबाबत बेस्ट समितीच्या सोमवारच्या बैठकीत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बेस्टच्या ४००० बसगाडय़ांतील डुगडुगणा-या आसनांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी त्या त्या कंपन्यांवर सोपवली आहे. परंतु आजपर्यंत केवळ ११०० गाडय़ांतील आसनांची दुरुस्ती झाली आहे. उर्वरित तब्बल २ हजार ९०० बसगाडय़ांतील आसने आजही डुगडुगत आहेत. बेस्टच्या ताफ्यातील ४०० पैकी ८० टक्के गाडय़ांतील कॅमेरे बंद पडले आहेत. तर बस कधी, कुठे पोहोचली, याची माहिती मोबाइलवर मिळत नसल्याचा आरोप बेस्ट समिती सदस्यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत केला आहे.


अल्लादिया संगीत महोत्सवाचा सांगितिक अनुभव

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हिंदुस्थानी शास्त्राrय संगीताचा प्रसार म्हणून 38 व्या वार्षिक संगीत सम्राट अल्लादिया खान संगीत महोत्सव 2015 ला पाठबळ देणार आहे. 4 दिवस चालणारा हा महोत्सव 2 ते 5 एप्रिल 2015 पर्यंत बालविकास संघ सभागफह, चेंबूर दरम्यान रंगणार आहे.


हिंदुस्थानी शास्त्राrय संगीताचे मूळ प्राचीन आहे, ते अस्सल आहे आणि हजारो वर्षांपूर्वीच्या शास्त्रपुराणात, परंपरेत त्याचे दाखले मिळतात. गेल्या अनेक वर्षांपासून संगीत सम्राट अल्लादिया खान संगीत महोत्सव मुंबईतला एक प्रसिद्ध कार्यक्रम म्हणून परिचित आहे. या माध्यमातून भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे एकसंध चित्र उपस्थितांना अनुभवायला मिळते. यावर्षी एमटीडीसीने या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला असल्याने यंदा या महोत्सवात एक पाऊल पुढे जाऊन पर्यटकांना आकर्षित करण्याची योजना आहे. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नानौटिया म्हणाले की, ‘भारताला लाभलेल्या समफद्ध परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन शास्त्राrय संगीतातून होते.’ हा महोत्सव दरवर्षी मोठी गर्दी खेचत असतो. शास्त्राrय संगीतप्रेमींसोबत त्यापलीकडे मोठय़ा प्रमाणावर असलेल्या संगीत रसिकांपर्यंत पोहचण्याची खरी योजना आहे. मागच्या काही वर्षांमध्ये आमच्याकडे पर्यटक, प्रामुख्याने परदेशी पर्यटकांकडून ते भारतात आल्यावर यासंदर्भात विचारपूस करण्यात येत होती. त्यांना आपली संस्कृती तसेच कला याबाबतीतील विविध बाजूंची गोडी असते, त्याबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा असते. त्यामुळे हा मुद्दा त्यांना आकर्षित करण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावेल.’


या जलशामध्ये काही लोकप्रिय शास्त्राrय वादक सहभागी होणार आहेत. त्यामध्ये पद्मश्री पंडित सतीश व्यास, पंडित विनायक तोरवी, मिलिंद चित्तल, विदुषी देवकी पंडित, डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे आणि श्रीमती गौरी पाठारे भाग घेणार आहेत. आजही गेल्या वर्षीच्या 2014 महोत्सवाची प्रशंसा लोक करताना दिसतात. मागच्या वर्षी विदुषी पद्मा तळवलकर, विदुषी शुभदा पराडकर, पंडित गणपती भट, पंडित नित्यानंद हळदीपूर आणि उस्ताद बहाउद्दीन डागर यांचा सहभाग होता.


BOLLYWOOD>> भद्रकालीचा चार दिवसांचा नाटय़ महोत्सव!

प्रतिनिधी, मुंबई

अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक मच्छिंद्रकांबळी यांच्या ६८ व्या जयंती निमित्ताने भद्रकाली नाटय़ संस्थेतर्फे २ ते ५ एप्रिल या कालावधीत नाटय़ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसांच्या या महोत्सवात दहा नाटके सादर होणार आहेत.

२ एप्रिल रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार असून त्यानंतर दिवसभरात ‘नांदी’, ‘समुद्र’ आणि ‘वस्त्रहरण’ ही नाटके सादर होणार आहेत. ३ एप्रिल रोजी ‘बिनधास्त पाहा बीपी’, ‘बेचकी’, ‘सुखाशी भांडतो आम्ही’ ही नाटके, तर ४ एप्रिल रोजी ‘करायचं ते दणक्यात’ व ‘पांडगो इलो रे बा इलो’ ही नाटके सादर होणार आहेत.

५ एप्रिल रोजी ‘आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे’ आणि ‘जस्ट हलकं फुलकं’ या नाटकांनी महोत्सवाचा समारोप होणार आहे. नाटय़ महोत्सवातील सर्व नाटके यशवंत नाटय़ मंदिर, माटुंगा येथे सादर होणार आहेत.


संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रिबेकाला कर्करोग!

ribeca tiger

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एकमेव पांढरी वाघीण सध्या कर्करोगाने आजारी आहे.


ribeca tiger मुंबई – संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एकमेव पांढरी वाघीण सध्या कर्करोगाने आजारी आहे. एकूण तीन पांढ-या वाघांपैकी रिबेका या वाघिणीचे वय आता १९ वर्षे म्हणजेच वाघांच्या आयुर्मर्यादेच्या दृष्टीने अत्यंत वार्धक्याला पोहोचले असल्यानेच तिला केमोथेरपीचे उपचार कसे द्यायचे, कधीपासून द्यायचे, यावर पशुतज्ज्ञ विचार करत आहेत.


पांढरे वाघ एरव्ही जंगलात १५ ते १६ वष्रे जगतात. बंदिस्त वातावरणात ते एखाद्-दोन वष्रे अधिक जगतात. पांढ-या वाघांना मुळातच जनुकीय दोष असतो व या प्रजातींत कर्करोग होऊ शकतो, असे राष्ट्रीय उद्यानाचे पशुतज्ज्ञ सांगतात. यापूर्वी याच उद्यानात रेणुका या पांढ-या वाघिणीचाही कर्करोगानेच मृत्यू झाला होता.


रिबेकाला तिच्याप्रमाणेच काही दिवसांपूर्वी डोळ्याजवळ गाठ आली असता, त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र त्याच वेळी तिला कर्करोग असल्याचे निदान झाले. कर्करोगाचा संसर्ग इतरांना होण्याचा धोका नाही, परंतु तिला स्वतंत्र ठेवण्यात येत आहे. तिची गाठ काढल्यानंतर ती नेहमीप्रमाणे वावरत असली, तरी गाठ पुन्हा वाढते आहे, असे आढळले आहे. त्यामुळेच कर्करोगावर उपचार म्हणून केमोथेरपी देण्याचा विचार आता राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी करत आहेत. राष्ट्रीय उद्यानात सध्या बाजीराव व सिद्धार्थ हे आणखी दोन पांढरे वाघ आहेत.


तीन सिंह.. १४ बिबळे.. नऊ वाघ


गेल्या काही दिवसांत राष्ट्रीय उद्यानात वाघ-सिंहांपैकी अनेक प्राण्यांचा मृत्यू झाला. शोभा सिंहीण मरण पावली. बरेचसे बिबळे हे आठ ते नऊ वष्रे उद्यानात आहेत, मात्र प्राणी-माणूस संघर्ष सुरू झाल्यानंतर त्यांना अहमदनगर येथील उद्यानात स्थलांतरित करण्यात आले होते. त्यामुळे ज्यांचे मृत्यू झाले, ते वयोपरत्वेच झाले, असा उद्यान संरक्षकांचा दावा आहे. उंदीर, डास, कीटक यांच्यामार्फत होणा-या रोगराईच्या प्रादुर्भावावर आम्ही प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत, असे हे अधिकारी सांगतात. गेल्या काही दिवसांत उद्यानाच्या लगतच्या भागांत रानडुकरे, माकडे यांच्या शिकारी झाल्याचेही उघड झाले आहे. सध्या उद्यानात तीन सिंह, १४ बिबळे व नऊ वाघ आहेत. नऊ वाघांपैकीच तीन पांढरे आहेत.


पोलिसांच्या कामावर सकारात्मक परिणाम होईल!

Mumbai Police

ऑन डय़ुटी चोवीस तास काम करूनही नेते आणि लोकांचे शिव्याशाप मिळवणा-या पोलिसांसाठी एक दिलासादायक गोष्ट घडली आहे.


Mumbai Police ऑन डय़ुटी चोवीस तास काम करूनही नेते आणि लोकांचे शिव्याशाप मिळवणा-या पोलिसांसाठी एक दिलासादायक गोष्ट घडली आहे. महाराष्ट्रातील दोन लाख ६ हजार पोलिसांना सुट्टीच्या दिवसाचा पूर्ण पगार देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. त्याची अंमलबजावणी होईल, अशी आशा बाळगू या.


पण या निर्णयामुळे अगदीच दुख-या नसेवर काही प्रमाणात उतारा मिळाला आहे, असे म्हणावे लागेल. आणीबाणी, दंगल अशा परिस्थितीत जीवावर उदार होऊन काम करणारे आणि त्याचबरोबर सण-उत्सव असो पोलीस लोकांच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज असतात. त्यांना असावेच लागते. ते त्यांचे कर्तव्य आहे; परंतु अशा प्रकारे कर्तव्य करत असताना त्यांचेही कुटुंब आहे आणि त्यांनाही सुट्टी घेण्याचा अधिकार आहे, याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जाते.


विशेष म्हणजे त्यांची सुट्टी फक्त कागदावर असते. प्रत्यक्षात ती त्यांना घेता येतच नाही आणि या सुट्टीचे त्यांना वेगळे मानधन दिले जाते. ते प्रत्येकी ६० रुपये इतके तुटपुंजे असते. त्यामुळे सुट्टी न घेता आल्याचा ताण, कुटुंबाला वेळ न आल्याचा ताण आणि जो दिवस भरला त्याचे तुटपुंजे मानधन किंवा भत्ता हा असून नसल्यासारख्या असल्यामुळे या ताणात अधिकच वाढ होत होती. कामाच्या वेळा १० ते १२ तास. त्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर दोन ते तीन दिवस लागोपाठ डय़ुटी. खाण्या-जेवणाचे तर सोडा पण प्रातर्विधी किंवा इतर गोष्टींचीही बोंब असते. त्यामुळे सरकारने सुट्टीच्या दिवशी एखाद्या पोलीस किंवा पोलीस निरीक्षकाला कामावर बोलावले तर त्याला सुट्टीच्या मोबादल्याऐवजी आता पूर्ण दिवसाचा पगार मिळणार आहे.


मुळात कोणत्याही आपत्कालीन दलात मग ते पोलीस, अग्निशमन दल असो, निमलष्करी किंवा लष्करी दल असो त्यात सतत आणीबाणीचे प्रसंग येत असतात. तशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्यांना सज्ज राहावेच लागते. त्यासाठी त्यांचे कौतुक करू नये, असेही नाही. पण त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदलाही मिळाला पाहिजे. लोक पोलिसांकडून मोठया प्रमाणात अपेक्षा ठेवतात; पण त्यांच्या स्वत:च्या वैयक्तिक आणि कामामधील अडथळय़ांबाबत जराही विचार करत नाहीत.


भाजपा सरकारने पुढेही पोलिसांच्या समस्या धसास लावण्यासाठी प्रयत्न करावेत. पोलिसांच्या वसाहती आहेत; पण त्या राहण्यास अत्यंत धोकादायक झाल्या आहेत. पोलिसांना स्वत:ची घरेही नाहीत. एकूणच पोलिसांच्या वैयक्तिक व कामासंबंधीच्या समस्या जाणून घेऊन त्यावरही काही ठोस असे उपाय केले तर पोलिसांवरील ताण आणखी कमी होण्याची शक्यता आहे. असे झाले तर त्याचे सकारात्मक परिणाम त्यांच्या कामावरही दिसायला लागतील.


विराटच्या गुणवत्तेवर शंका नको

Ravi Shastri and Virat Kohli

विश्वचषक स्पर्धेत भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर गुणवान फलंदाज विराट कोहलीला टीकेचे लक्ष्य केले जात आहे.


Ravi Shastri and Virat Kohli नवी दिल्ली – विश्वचषक स्पर्धेत भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर गुणवान फलंदाज विराट कोहलीला टीकेचे लक्ष्य केले जात आहे. मात्र संघ संचालक (टीम डायरेक्टर) रवी शास्त्री यांनी त्याची बाजू घेतली आहे. विराटच्या गुणवत्तेवर शंका घेऊ नका. तसेच मैत्रीण अनुष्का शर्माची उपस्थिती आणि कोहलीच्या बाद होण्याचा काहीच संबंध नसल्याचे शास्त्री यांनी मंगळवारी सांगितले.


‘‘कोहलीमध्ये देशभक्ती ठासून भरली आहे. प्रत्येक सामन्यात सवरेत्कृष्ट कामगिरीचा त्याचा प्रयत्न असतो. गेल्या वर्षी इंग्लंड दौ-यातील खराब कामगिरीनंतर त्याने स्वत:मध्ये खूप बदल केले. विश्वचषकात कोहलीने चांगली फलंदाजी केली. त्यापूर्वीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ४ शतकांसह त्याने सातशे धावा केल्या. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत महत्त्वाच्या लढतीत विराटने विकेट फेकली किंवा अन्य कारणामुळे त्याचे लक्ष विचलित झाले, असे म्हणणे निराधार आहे. परिणामी कोहलीची गुणवत्ता किंवा देशभक्तीबाबत शंका घेणे चूक आहे,’’ असे शास्त्री म्हणाले. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत कोहली लवकर बाद झाल्याचा संबंध त्याची मैत्रीण अनुष्काच्या उपस्थितीशी जोडण्यात आला.


कसोटीतून निवृत्त झालेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीचीही शास्त्री यांनी प्रशंसा केलीय. ‘‘कसोटीतून पायउतार झाल्याने धोनीला उर्वरित वनडे आणि टी-२० क्रिकेट प्रकारांत फलंदाजीवर अधिक लक्ष्य केंद्रित करता येईल. पस्तिशीतही त्याने आपली तंदुरुस्ती चांगली राखली आहे. जगातील अनेक सवरेत्कृष्ट गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची क्षमता धोनीमध्ये आहे,’’ असे शास्त्री यांनी सांगितले. विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरला, असे शास्त्री यांना वाटते.


‘‘नाणेफेकीचा कौल त्या लढतीत महत्त्वपूर्ण होता. नाणेफेक हरल्याने भारताला खूप फटका बसला. त्यातच प्रतिस्पर्ध्यांनी अपेक्षेहून अधिक आव्हान ठेवल्याने फलंदाज दडपणाखाली खेळले. मात्र ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका आणि तिरंगी स्पर्धेतील अपयश पाहता भारताची कामगिरी विश्वचषकात निश्चितच उंचावली. फलंदाजांमध्ये शिखर धवन, रोहित शर्मा आणि सुरेश रैनाने तसेच उमेश यादव, मोहम्मद शामी, मोहित शर्मा आणि आर. अश्विनने प्रभावी गोलंदाजी केली,’’ असे शास्त्री म्हणाले.


विक्रमी पाचवे जेतेपद पटकावलेल्या ऑस्ट्रेलिया संघांचे शास्त्री यांनी कौतुक केलेय. ‘‘यंदाच्या विश्वचषकातील तो एक सवरेत्कृष्ट संघ होता. केवळ त्याच संघाने गतविजेत्या भारताला हादरवले. मायकेल क्लार्कचे कुशल नेतृत्व आणि उंचावलेली सांघिक कामगिरी ऑस्ट्रेलियाच्या जगज्जेतेपदाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले,’’ असे ते म्हणाले.